मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे महायुतीच्या उमेदवारीची संधी मिळाल्यानंतर मी आतापर्यंत केलेल्या सेवेची दखल घेत विविध समाज घटक उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत. मंगळवारी बदलापूर-अंबरनाथ स्कुल बस चालक-मालक वेल्फेअर असोशिएशनने माझ्या कामावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला. असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.
मतदार संघातून मोठ्या प्रमाणात मिळणारे हे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. त्यातून नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
#Kisankathore #Bjp4maharashtra