मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज मतदारसंघातील गावांमध्ये गाव भेटी दौरा पार पडला. यामध्ये मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे जिल्हा परीषद गटातील चिरड, आंबेटेंभे, आगाशी, गवाली, जांभुर्डे, डोंगरन्हावे, खानिवरे, साकुर्ली, बांगरपाडा, बांधिवली, घागूर्ली, आंबेगाव या गावातील नागरिकांशीची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘एकच दृष्टी, विकासाची सृष्टी’ व्हिजन पूर्णत्वास नेण्यासाठी गावकऱ्यांनी भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने मुरबाड विधानसभेवर पुन्हा ‘कमळ’ फुलवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ग्रामपंचायतीमधील महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
