कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्र. २ मध्ये वालिवली येथे प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी नागरिकांनी एकत्र येऊन विकासासाठी आणि प्रगतीसाठी महायुतीला पाठिंबा दिल्याचे दिसून आले. आपल्याला विकासकामांच्या जोरावर विकासाची एक सृष्टी निर्माण करायची आहे. त्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला ‘कमळ’ चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने पुन्हा सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.