मुरबाडमध्ये विकासाच्या गंगेसाठी कमळाला पाठिंबा; जनतेच्या उत्स्फूर्त स्वागताने प्रचाराला जोर

मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुरबाड तालुक्यातील सरळगाव जिल्हा परिषद गटातील माजगाव, पारतळे, लिहेपाडा आणि साखरे येथील गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या नेतृत्वाने मतदारसंघातील तळागाळात विकासाची गंगा वाहत आहे. दर्जेदार रस्त्यांनी प्रत्येक गावखेड्यांना वेगळी ओळख निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्यात समविचारी सरकार असल्यावर विकासाला गती प्राप्त होत असते. याचा प्रत्यय मतदारसंघातील जनतेला आला आहे. मोठ्या प्रमाणात निधीसह विकासाचा ओघ असाच सुरु ठेवण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन यावेळी केले.

या गावभेटी दौऱ्यात प्रत्येक गावातील मुलाबाळांसह, महिला आणि थोरामोठ्यांचा प्रचंड पाठिंबा लाभत होता. फटाके, घोषणा आणि मायेने होणाऱ्या औक्षणाने जंगी स्वागतही होत होते. विशेष म्हणजे ही निवडणूक माझ्या एकट्याची नसून गावातील प्रत्येकाची असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. मायबाप जनतेचे हे प्रेम आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा कायम ऋणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *