कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील बॅरेज येथे मुरबाड विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ जाहीर सभा भरविण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला.
आपल्या मतदारसंघात महायुती सरकारच्या सहयोगाने पायाभूत सुविधांची उभारणी झाली आहे. आता भविष्यातही याच पद्धतीने आपल्याला मुरबाड विधानसभा मतदारसंघातील शहर आणि तळागाळातील गाव-खेड्यांच्या अधिक विकास करायचा आहे, यासाठी आपल्या सर्वांची साथ अत्यंत महत्वाची आहे. यामुळे सर्वांनी येत्या २० नोव्हेंबरला ‘कमळ’ चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी केले.
यासभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, महिला वर्ग आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.